वनस्पती संवेदनशील आहेत का ?
वनस्पती संवेदनशील आहेत किंवा नाहीत या बद्दल बरयाच वेळेला विचारणा विद्यार्थी करतात.प्रतिसाद हा प्रत्येक सजीवांचा महत्वाचा गुणधर्म आहे.याला वनस्पती अपवाद नक्कीच नाहीत.प्राण्यांप्रमाणे यांच्यामध्ये चेतापेशी नसल्यामुळे प्रतिसाद हा अत्यंत मंद वेगाने असतो.प्रकाशाच्या दिशेने वाढणे तसेच मुळांची पाण्याच्या दिशेने होणारी वाढ हा देखील वनस्पतीचा प्रतिसाद आहे.लाजाळू सारख्या वनस्पतींमध्ये प्रतिसाद लगेच दिसून येतो. घटपर्णी सारखी कीटकभक्षी वनस्पतींमध्ये सुद्धा प्रतिसाद लगेच दिसतो. वनस्पती संगीत व ध्वनी यांना प्रतिसाद देतात हे प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे.भारतीय थोर संशोधक डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींचे हुंदके रेकॉर्ड केले आहेत.त्यांच्या संशोधनामध्ये त्यांनी दाखवून दिले कि कोबी चिरल्यानंतर मोठ्या प्रमाणात हुंदके देतो.वनस्पतींच्या संवेदनशीलतेवर विविध प्रकारचे प्रयोग झालेले आहेत.संगीताचा वनस्पतींच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो म्हणजेच त्यांना श्रवण क्षमता आहे.काही वनस्पती या नागाच्या फण्यासारखा आकार फुलांना धारण करतात,त्या वनस्पतींना आजूबाजूचे सजीव या प्राण्याला घाबरतात याची दृश्य संवेदना असणार.वनस्पतींचे बहरणे,फुलणे व विकसीत होणे हे संवेदनशीलतेवर अवलंबुन असते म्हणजेच त्यांना संवेदना आहेत हे नक्की आहे.
श्री.भिडे एन.जी. सोलापूर
98 60 23 88 25
वनस्पती दृश्य संवेदना व श्रवणक्षमता आहे हे नक्कीच सांगावे वाटते
ReplyDelete